Ladki Bahin Yojana 3rd Installment Credit, 4500 रुपये लाखो महिलांच्या खात्यात जमा, पहा संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Credit, 4500 रुपये लाखो महिलांच्या खात्यात जमा, पहा संपूर्ण माहिती.








Ladki Bahin Yojana 3rd Installment Credit : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे.

या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईनअर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यामधील काही दिवसाअगोदर लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणून 3000 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे परंतु असे अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेत परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळाले नाही आणि त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे

महाराष्ट्र सरकारने 14 सप्टेंबर 2024 रोजी या योजनेअंतर्गत उर्वरित लाखो महिलांच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या संदर्भात अनेक महिलांच्या मोबाईल वर एसएमएस पण आलेला आहे तर सरकारने या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये किती पैसा जमा केलेला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया

₹4500 रुपये ह्या महिलांच्या खात्यात जमा





मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन सादर केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले होते. परंतु त्यांना या योजनेचा एकही रुपया मिळालेला नव्हता अशा सर्व महिलांना तीन महिन्याची मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे.

₹1500 रुपये ह्या महिलांच्या खात्यात जमा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये मागील टप्प्यांमध्ये जमा झालेले आहेत अशा सर्व महिलांना सरकारकडून त्यांच्या खात्यामध्ये ₹1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments