SBI सह या 5 मोठ्या बँका देतात तुम्हाला स्वस्तात गृहकर्ज! तेही दीर्घकालीन.

 

गृहकर्ज ही एक दीर्घकालीन कर्जाची योजना आहे. साधारणपणे लोक २० ते २५ वर्षांसाठी गृहकर्ज घेतात. म्हणून व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. कमी व्याज देणारी बँक निवडावी.

जर तुम्हाला घर खरेदी करायची असेल आणि त्यासाठी कर्ज घ्यावे लागेल तर कमी व्याजदर आणि कमी प्रक्रिया शुल्क देणारी बँक शोधावी.

गृहकर्ज हे दीर्घकालीन कर्ज असल्याने, व्याजदरातील किंचितसा फरकही महत्त्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येकजण कमी व्याजदरावर कर्ज घेऊ इच्छितो. आम्ही तुम्हाला SBI, HDFC बँक यासह ५ मोठ्या बँकांकडून देण्यात येणाऱ्या गृहकर्जाच्या व्याजदराची माहिती देत आहोत.

१) एचडीएफसी बँक: एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून ती वार्षिक ९.४% ते ९.९५% या दरम्यान व्याजदरावर गृहकर्ज देते.

२) एसबीआय: स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जदाराच्या सीआयबीआयएल क्रेडिट स्कोअरवर आधारित ९.१५% ते ९.७५% या व्याजदरात गृहकर्ज देते.

३) आयसीआयसीआय बँक: ही खाजगी बँक ९.४०% ते १०.०५% या दरम्यान गृहकर्ज देते. ३५ लाखांपेक्षा कमी गृहकर्जासाठी व्यवसायिकांना ९.४०% ते ९.८०% व पगारदार व्यक्तींना ९.२५% ते ९.६५% व्याजदर लागू होतो.

४) कोटक महिंद्रा बँक: ही खाजगी बँक कामगारांना ८.७% तर व्यावसायिकांना ८.७५% व्याजदरावर गृहकर्ज देते.

५) पंजाब नॅशनल बँक: सीआयबीआयएल स्कोअर, कर्जाची रक्कम व कर्जाची मुदत यावर आधारित ९.४% ते ११.६% या व्याजदरात गृहकर्ज देते. उदाहरणार्थ, ८०० क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्जदाराला ३० लाखांहून अधिक रकमेसाठी ९.४% हा सर्वात कमी व्याजदर देण्यात येतो.

गृहकर्ज दीर्घकालीन असल्याने व्याजदरातील लहानसा फरकही महत्त्वाचा ठरतो. म्हणून कमीत कमी व्याजदरावर कर्ज घेणे योग्य होईल.

Post a Comment

0 Comments