आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.


 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने “आवडेल तिथे कुठेही प्रवास” ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एका स्वस्त किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करता येईल. ही योजना १९८८ पासून अस्तित्वात आहे.

या योजनेंतर्गत दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत – ४ दिवसांचा आणि ७ दिवसांचा. हे पास लालपरी बसेससाठी वापरता येतील. म्हणजेच साध्या, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती आणि आंतरराज्य बसेससाठी हा पास वैध असेल. परंतु शिवशाही वातानुकूलित बसेससाठी वेगळे दर लागू असतील.

४ दिवसांच्या पासाची किंमत प्रौढांसाठी १,१७० रुपये आणि लहान मुलांसाठी (५ ते १२ वर्षे) ५८५ रुपये आहे. तर शिवशाही बसच्या ४ दिवसांच्या पासाची किंमत प्रौढांना १,५२० रुपये आणि मुलांना ७६५ रुपये येईल.

७ दिवसांच्या साधाराण बसच्या पासासाठी प्रौढांना २,०४० रुपये तर मुलांना १,०२५ रुपये द्यावे लागतील. परंतु शिवशाही बसच्या ७ दिवसांच्या पासासाठी प्रौढांची किमान किंमत ३,०३० रुपये आणि मुलांची किंमत १,५२० रुपये असेल.

या योजनेचा विशेष फायदा म्हणजे ५ वर्षाखालील मुलांना बसप्रवासासाठी कोणतेही तिकीट घ्यावे लागणार नाही. तर १२ वर्षांवरील मुलांसाठी पूर्ण तिकिटाची आवश्यकता असेल.

अशारीतीने ही योजना उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळात कुटुंबासह किंवा मित्रमंडळींसोबत संपूर्ण महाराष्ट्रात स्वस्त आणि सुलभरित्या प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून देते. आपण आवडेल तिथे कुठेही जाऊ शकता. मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

Post a Comment

0 Comments