भारतात टोमॅटो उत्पादन हे कोणत्या राज्यात जास्त घेतले जाते? आणि आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? (पहा सविस्तर माहिती)

 

मित्रांनो, आपण आता टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत भारतातील विविध राज्यांविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

मध्यप्रदेश: हे भारतातील सर्वात मोठे टोमॅटो उत्पादन करणारे राज्य आहे. देशाच्या एकूण टोमॅटोच्या उत्पादनापैकी १४.६३% एवढे उत्पादन या राज्यात घेतले जाते.

आंध्रप्रदेश: देशात सर्वाधिक टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या राज्यांच्या यादीत दुसरा क्रमांक या राज्याचा लागतो. एकूण देशिय उत्पादनापैकी १०.९२% टोमॅटोची निर्मिती इथे होते.

कर्नाटक: यादीत तिसऱ्या क्रमांकावर हे राज्य येते. भारताच्या एकंदर टोमॅटो उत्पादनापैकी १०.२३% उत्पादन कर्नाटकात होते.

ओडिशा: भारताच्या सर्व टोमॅटो उत्पादनापैकी ७.०६% टोमॅटो उत्पादन ओडिशा राज्यात घेतले जाते. तो चौथ्या क्रमांकावर आहे.

तमिळनाडू: टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर तमिळनाडू राज्य आहे. इथे देशाच्या एकूण उत्पादनापैकी ७.३४% टोमॅटो निर्मिती होते.

आपल्या महाराष्ट्र राज्याला तर देशातील टोमॅटोच्या सर्व उत्पादकांच्या यादीत नववा क्रमांक प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रात केवळ ४.५४% टोमॅटो पीक घेतले जाते. गुजरात, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड हे राज्य टोमॅटो बागायतीच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे आहेत.

मित्रांनो, टोमॅटो शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनाचा मोबदला योग्य प्रकारे मिळणे आवश्यक आहे. याशिवाय टोमॅटोच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला पाहिजे.

Post a Comment

0 Comments