महाराष्ट्रात पुन्हा 2 नवीन महामार्ग तयार होत आहेत, कोणत्या भागातून जाणार हे 2 महामार्ग ? वाचा डिटेल्स

 

महाराष्ट्रात दोन अतिशय महत्वाचे नवीन महामार्ग बांधले जाणार आहेत. या दोन नवीन महामार्गांचा रूट काय असणार आहे याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हे महामार्ग कोणत्या जिल्ह्यांतून जाणार आहेत, यामुळे कोणाला फायदा होऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. या महामार्गामुळे नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत चांगला व वेगवान होईल.

हा रस्ता कोणता आहे हे आपण इथे पाहणार आहोत. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मुंबई ते कोकण आणि गोवा हा प्रवास वेगवान करण्यासाठी कुकुंदगीर्ती महामार्ग आणि कोकण सागरी किनारा महामार्ग असे दोन नवीन महामार्ग तयार होत आहेत.

यामुळे भविष्यात मुंबई ते कोकण तसेच मुंबई ते गोवा हा प्रवास जलद होणार आहे. या रस्त्यांच्या माहितीबद्दल आपण आता बघणार आहोत.

सध्या रस्ते विकास महामंडळामार्फत मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता 701 किमी लांबीचा आहे. यापैकी 600 किमी लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही मोठ्या वेगाने सुरू आहे. उर्वरित काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि हा रस्ता मुंबईपर्यंत येईल.

याच धर्तीवर मुंबई ते गोवा कोकण महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग सहा पदरी असून त्याची लांबी 388 किमी असेल. हा महामार्ग नवी मुंबईतील पनवेल येथून सुरू होईल आणि गोवा-महाराष्ट्र सीमेवर संपेल. या महामार्गामुळे सध्या मुंबई ते गोवा प्रवासासाठी लागणारा पाच तासांचा कालावधी फक्त तीन तासांवर येईल. या प्रकल्पावर सुमारे 25 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

याशिवाय, मुंबई ते गोवा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी रेवस ते रेड्डी दरम्यान 498 किमी लांबीची सागरी किनारा रस्ता देखील विकसित करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दोन्ही प्रकल्पांच्या कामासाठी आणखी काही कालावधी लागेल. अशारितीने महाराष्ट्रात दोन नवीन महामार्ग तयार होणार आहेत. धन्यवाद…

Post a Comment

0 Comments